Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक
(Bacchu Kadu Protest ) बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये आंदोलन सुरु असून अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडूंनी औषधं घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला आहे. आज मनोज जरांगे पाटील गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांकडून महायुतीचे बॅनर जाळण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.