बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे कारण?
बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. न्याय मिळत नसेल तर त्या पदावर राहण्यात अर्थ नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही देता मात्र दिव्यांगना पैसे देत नसल्याचं विधान अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांनी या संदर्भात सरकारला पत्र ही लिहिलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
न्याय मिळत नसेल तर त्या पदावर राहण्यात अर्थ नाही. इतर राज्यात दिव्यांगाना ४ हजार रूपयांचे मानधन आहे. मात्र, आपल्या राज्यात १५०० रूपयांचं मानधन दिलं जातं. लाडक्या बहिणींनाही १५०० रूपयांचा सन्माननिधी दिला जातो, आणि ज्यांना दोन पाय नाहीत त्यांना ही १५०० रूपयांचा सन्माननिधी दिला जातो हा अन्याय आहे. दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. दिव्यांगांना त्यांचं मानधन वाढवून मिळत नसेल, वाढवून मिळत नसेल. तर त्या पदावरून राहण्यात अर्थ नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.