Bachchu Kadu : बच्चू कडू वर्धा लोकसभा लढवणार? बच्चू कडूंनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी

वर्धा लोकसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांची चाचपणी सुरु झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

वर्धा लोकसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांची चाचपणी सुरु झाली आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावती विभागातील प्रहारची तातडीने बैठक बोलावली आहे. बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज वर्धा येथे प्रहार कार्यकर्ते रक्तदान करून बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी अशी मागणी बच्चू कडूंकडे केली आहे. दुपारी 2 वाजता शेकडो कार्यकर्ते बच्चू कडूकडे मागणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची ठरणार असून या बैठकीकडे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com