व्हिडिओ
बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आरोपी अक्षय शिंदेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी अक्षय शिंदेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीनंतर आता आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.