व्हिडिओ
Beed Sarpanch Case | संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID तपासात मोठी प्रगती, स्कॉर्पिओमधील दोन मोबाईल्समध्ये मारहाणीचा व्हिडिओ आणि एका बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती मिळाली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग झाल्यानंतर तपासाला वेग आलाय..हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडी पथकाला दोन मोबाईल्स आढळून आले आहेत. या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. तर याच मोबाईल वरून एका बड्या नेत्याला फोन देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..