Belgaum Marathi Melava Update : कन्नडीगांची मुजोरी! बेळगावात मराठी बांधवांच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

बेळगावात मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारली गेली आहे, शिवसेनेची रॅली कोल्हापूर ते बेळगावपर्यंत काढण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

बेळगावात मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे तसेच बेळगावात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी देखील आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची रॅली याठिकाणी काढण्यात येणार आहे. कोल्हापूर ते बेळगावपर्यंत ही रॅली काढली जाणार असून कोल्हापूरात महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली काही वेळातच बेळगावकडे रवाना होणार आहे.

याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते म्हणाले की, मराठी माणसांच्या हद्दीमध्ये तुम्ही अधिवेशन घेत आहात. लोकशाही जिंवत आहे का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर मराठी माणसाला कर्नाटकच्या प्रशासनाने त्रास दिला, तर मग त्याची रिअ‍ॅक्शन कोल्हापूरात आजपासून चालू होईल. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. दिला आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com