व्हिडिओ
BEST Bus Viral Video | बेस्ट बसच्या चालकाचं ऑनड्युटी मद्यपान? व्हिडीओ व्हायरल, कारवाई होणार का?
मुंबईतील अंधेरी पश्चिमेत बेस्ट बस चालकाने ऑनड्युटी वाईन शॉपवर थांबून दारू घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल, चालकावर कारवाई होणार का?
कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघाताचा विषय ताजा असतानाच मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चालक ऑनड्युटी दारु दुकानातून घेऊन बसमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस चालकावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्हिडीओमध्ये काय दिसतयं?
बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला.
कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस भीषण अपघात झाला. या अपघाताने अख्खी मुंबई हादरली. या भीषण अपघातात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आणि ४८ लोकं गंभीर जखमी झाली असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.