व्हिडिओ
Nanded| ना मसाला, ना तेल, ना फोडणी: नांदेडच्या तामसा येथे भाजी भाकरीची पंगत
नांदेडच्या तामसा येथे मकरसंक्रांतीनंतर करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत, 150 वर्षांची परंपरा आजही कायम.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे बारलिंग महादेवाचे देवस्थान आहे. या देवस्थानच्या ठिकाणी मकरसंक्रांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत भरत असते. मागील दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा अविरतपणे आजही या ठिकाणी सुरू आहे. यावर्षी अडीचशे क्विंटल भाजी बनवण्यात आलीय. तर पंचक्रोशीतील महिला दीडशे क्विंटल भाकरी बनवून आणून देतात. या भाजी-भाकरीच्या पंगतीचे महत्व म्हणजे एका मोठया कढईमध्ये सर्वच प्रकारच्या भाज्या टाकण्यात येतात आणि ही भाजी बनवताना कोणताही मसाला किंवा तेल वापरत नाहीत. सर्व प्रकारच्या मिसळीच्या भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी खाल्याने शरीरातील रोगराई दूर होते अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या भाजी भाकरीच्या पंगतीला मराठवाडा,तेलंगणा, विदर्भ या ठिकाणाहून लाखो भाविक येत असतात.