व्हिडिओ
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी सांगितला मंत्रिपदाचा भन्नाट किस्सा
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून महाडचे आमदार भरत गोगावले यांनी फिल्डिंग लावली होती.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून महाडचे आमदार भरत गोगावले यांनी फिल्डिंग लावली होती. पण मंत्रिपद भरत गोगावलेंना मिळालं नाही. मंत्रिपद का मिळालं नाही याची इनसाईड स्टोरी खुद्द भरत गोगावलेंनी सांगितलीय. मंत्रिपद मिळालं नाहीतर बायको आत्महत्या करेल असं सांगून एका आमदारानं मंत्रिपद मिळवल्याचा दावा गोगावलेंनी केलाय. तर एका आमदारानं राणेंपासून संरक्षण मिळावं म्हणून मंत्रिपद मागितल्याचं गोगावलेंनी सांगितलंय. अनेक आमदारांनी अशीच कारणं सांगितल्यानं आपला मंत्रिपदाचा नंबर हुकल्याचा दावा गोगावलेंनी केलाय.