Bhaskar Jadhav On Shivsena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेची जवळ जवळ कॉंग्रेस झाली, जाधवांच मोठं वक्तव्य

भास्कर जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ जवळ काँग्रेस झाल्याचे म्हटले. शाखा प्रमुखांच्या कार्यकाळाबद्दल जाधवांनी प्रश्न उपस्थित केले. ऑडियो क्लिप समोर आली, मात्र लोकशाही मराठीने पुष्टी केली नाही.
Published by :
Prachi Nate

ठाकरेंच्या शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडेबोल आहेत. शाखा प्रमुख आहेत कुठे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 10 ते 15 वर्ष झाली पदाधिकारी एकाच जागेवर आहेत असं देखील भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधवांच्या भाषणाची ऑडियो क्लिप आता समोर आली आहे. मात्र या सर्व संदर्भात लोकशाही मराठी या ऑडियोची पुष्टी करत नाही.

यादरम्यान या भाषणात भास्कर जाधव म्हणाले की, एकवेळेस बाळासाहेबांच्या विचारानुसार पद ही येतील आणि जातील पण सर्वश्रेष्ठ पद कोणी कोणाचं काढून घेणार नाही ते म्हणजे शिवसैनिक हे पद... शाखा प्रमुख,तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा... भास्कर जाधव यांचे विनायक राऊत यांना सल्ला.

तसेच पुढे भास्कर जाधव म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत.... जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही...काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं...चिपळूण मधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल काढली. मात्र या सर्व संदर्भात लोकशाही मराठी या ऑडियोची पुष्टी करत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com