व्हिडिओ
भावना गवळी यांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान, कोणतं मंत्रिपद मिळणार?
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात तब्बल 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमदार भावना गवळी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 12 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भावना गवळी यांची वर्णी लागणार आहे. भावना गवळी सध्या विधानपरिषद सदस्या आहेत. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात तब्बल 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात तब्बल 5 वेळेस खासदार राहिल्या असल्यामुळे त्यांना दांडगा अनुभव असल्याचं बोललं जातं आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याने वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.