Bhiwandi Building Collapse
Bhiwandi Building Collapse

Bhiwandi Building Collapse : भिवंडी मध्ये दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू

भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृत व्यक्ती 25 वर्षीय होता.

भिवंडी : अभिजित हिरे | भिवंडी मध्ये दुमजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ढिगार्‍याखाली कुणी अडकलं आहे का? याचा तपास अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही घटना आज सकाळची असून भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये या घटनेमुळे पहाटे नागारिकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.

Bhiwandi Building Collapse
पुण्यात आजपासून सीएनजी पंप राहणार बंद

या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. माजिद अन्सारी वय 25 वर्षं असं या तरुणाचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com