Maharashtra Politics : बावनकुळें नंतर गिरीश महाजनांच मोठं वक्तव्य

काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून मिलिंद देवरा यांच्या महायुतीच्या प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत पुढील काळात अजूनही मोठे भूकंप होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले
Published by :
Team Lokshahi

काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून मिलिंद देवरा यांच्या महायुतीच्या प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत पुढील काळात अजूनही मोठे भूकंप होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले तर पुढच्या पंधरा दिवसात भाजपमध्येही अपेक्षित नाही असे लोक पक्षप्रवेश करणार असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत अनेक मोठे नेते येणार असल्याचा दावा केला आहे. मंत्री गरीष महाजन यांनी देखील पुढील काळात अजून मोठे भूकंप होणार असून 'अपेक्षित नसलेले लोक भाजपमध्ये प्रवेश करतील असं विधान केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळ्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com