Jitendra Awhad : आव्हाडांविरोधात कोल्हापुरात भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड इथल्या आंदोलन दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यामुळे वातावरण खूप तापलेलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड इथल्या आंदोलन दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यामुळे वातावरण खूप तापलेलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपच्या वतीने कोल्हापूरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.

कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजप कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध ही नोंदविण्यात आला. हे आंदोलन कोल्हापुरातील बिंदूत चौक परिसरात झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com