व्हिडिओ
BJP Cabinet Minister List : भाजपची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादीत कोकणातील नितेश राणे, बीड-परळीतून पंकजा मुंडे यांना संधी. गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ मंत्रीपदी विराजमान होणार का? जाणून घ्या संपूर्ण यादी.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न पक्षाने दिला आहे. मात्र यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांना धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणातून नितेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता आहे तर बीड-परळीतून पंकजा मुंडेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री
कोकण
रविंद्र चव्हाण, नितेश राणे
मुंबई
मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
गिरीश महाजन, जयकुमार रावल
मराठवाडा
पंकजा मुंडे, अतुल सावे
विदर्भ
सुधीर मुनगंटीवार