पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर?

राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून विशेष तयारी सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची रणनिती आखण्यात गुंतले आहेत. यादरम्यान पुण्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातच पुणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आणखी एक नवीन नाव पुढे आले आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी सुनील देवधर इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com