BJP On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Published by :
Dhanshree Shintre

वंदे भारतमधून प्रवासाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी लोकही घेत असतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारकडून विकास झाला नाही, अशी त्यांनी त्यांच्या भाषणांमधून टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी खेड ते मुंबई प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार... मोदी सरकार ! असे दोन शब्दांचे कॅप्शन दिले आहे. भाजपकडून यासंदर्भात दोन फोटो ट्विट केले गेले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस हा नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com