Sanjay Raut : भाजप ही तुमची पार्टी आहे'; तुम्ही नाही बोलत तरी; राऊतांचा मोहन भागवत यांना टोला

मोहन भागवत यांच्या मुस्लमानांवरील वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला, भाजप हा तुमचा पक्ष आहे असे राऊत म्हणाले. मुस्लमानांना विरोध करणाऱ्यांवर भागवत यांनी उपाय करावा.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मोहनराव भागवत यांनी मुस्लमानांवर केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यामांशी संवाद साधला आहे. राऊत म्हणाले की, मुस्लमानांनी एकत्र काम करावे. तसेच त्यांचा आणि आमचा डीएनए एक आहे. असे मोहनराव भागवत वारंवार बोलतात. पण मुस्लमानांना विरोधसुद्धा त्यांच्या पक्षातील काही व्यक्ती करतात. मोहनराव भागवत यांनी त्यांच्या तोंडाला शिलाई मारली पाहिजे. कितीही नाही बोले तरी भाजप त्यांनी बनवलेला पक्ष आहे. असे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com