Video : महाराष्ट्रानंतर आता गुजरात, हिमाचलसह या राज्यांत ऑपरेशन लोटस

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसलाच नव्हे तर इतर प्रादेशिक पक्षांनाही नेस्तानूबूत करुन विरोधी पक्ष संपवण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्य काम करत आहे.

महाराष्ट्रात अडीच वर्षानंतर का होईना भाजपने ऑपरेशन लोटस सक्सेस केले. यापुर्वी मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे. आता त्यापेक्षाही मोठी रणनीती भाजपने तयार केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसलाच नव्हे तर इतर प्रादेशिक पक्षांनाही नेस्तानूबूत करुन विरोधी पक्ष संपवण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्य काम करत आहे. त्यासाठी संबंधित राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी यांची टीम तयार केली गेली आहे.

महाराष्ट्रानंतर गोवा, बिहार, झारखंड, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये भाजपची रणनीती तयार झाली आहे. गोवामधील भाजपचे होम वर्क पुर्ण झाले आहे. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार आहेत. त्यातील अनेक आमदार भाजपच्या वाटेवर आहे. गोव्याचे प्रभारी यांनी स्पष्ट सांगितले की, पक्षाकडून आदेश येताच आमचे सदस्य 11 ने वाढून 31 वर जातील. म्हणजेच गोवा पुर्ण कॉंग्रेसमुक्त होईल.

ऑपरेशन लोटस पार्ट-२ मध्ये गुजरात आणि हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठे झटके देण्यात येणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपचे ऑपरेशन लोटस सुरु केल्याचे जाहीर वक्तव्य सोमवारी केले. कर्नाटकमध्ये काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी भाजप काँग्रेस आमदारांना 50-50 कोटी देण्याची ऑफर देत असल्याचे सांगितले. तामीळनाडूत विरोधी पक्ष असलेले अण्णाद्रमुकने सोमवारी माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वन यांची पक्षातून हाकलपट्टी केली. आता त्यांना भाजपमध्ये आणले जाणार आहे. सोबत शशीकला यांचा गटही येणार आहे.

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणूक प्रचारात केली होती. त्यानंतर केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला फक्त 44 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही त्यांना मिळाले नाही. हळहळू एक-एक राज्य काँग्रेसकडून गेली. आता फक्त राजस्थान, छत्तीसगड आणि पॉंडिचेरी ही राज्य काँग्रेसची राहिली आहेत. दुसरीकडे भाजप आक्रमक असतांना काँग्रेसमध्ये पक्ष सांभाळण्यासाठी अध्यक्षच नाही. काँग्रेस नेत्यांमधील आपआपसातील मतभेदांमुळे भाजपला ऑपरेशन लोटस राबवणे सोपे होते आहे. आता महाराष्ट्रानंतर किती राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी होते, हे येणाऱ्या काळातच समजेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com