व्हिडिओ
भाजपला अध्यक्ष निवडीचे वेध, कोणाची नावं चर्चेत?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचे वेध लागले आहेत. भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावांचा विचार होऊ शकतो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर भाजपला आता राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचे वेध लागले आहेत. पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया १५ जानेवारीनंतर सुरू होणार असून, फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सूत्रे नव्या नेतृत्वाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाच्या शिल्पकारांपैकी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान या दोन तरुण नेत्यांचाही गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. देशाचे पंतप्रधान पश्चिमेतून, राष्ट्रपती पूर्वेतून, उपराष्ट्रपती उत्तरेतून असल्यामुळे भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी दक्षिणेतील नेत्याला संधी दिली जाऊ शकते, असेही मानले जात आहे.