Chhatrapati Sambhaji Nagar : निरक्षर सर्वेक्षणावर राज्यातील शिक्षकांचा बहिष्कार

राज्य शासनाने दिलेल्या सर्वेक्षणावर प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: राज्य शासनाने दिलेल्या सर्वेक्षणावर प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. 15 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निरक्षर, स्त्री-पुरुषांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाचे आदेश दिले आहेत. मात्र या सर्वेक्षणावर शिक्षकांनी आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या म्हणत बहिष्कार टाकला आहे. अशैक्षणिक कामामुळे अध्यापनास वेळ मिळत नसल्याने सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्याचे शिष्टमंडळाचे मत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com