व्हिडिओ
मराठा,ओबीसी नंतर आता ब्राह्मण समाजही रस्त्यावर उतरणार
ब्राह्मण समाजालाही परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे परशुराम आर्थिक महामंडळ हे ब्राह्मण समाजाला मिळायला पाहिजे. या मागणीसाठी वंदे मातरम सभागृह ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ब्राह्मण समाजालाही परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही काळात मराठा तसेच ओबीसी समाजांचे मोर्चे पाहायला मिळत होते. आता ब्राह्मण समाजाने सुद्धा आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली आहे.