व्हिडिओ
Sambhajinagar | शाळेत घुसलेल्या रेड्याने 13 विद्यार्थ्यांना केले जखमी, घाटी रुग्णालयात उपचार सुरु
संभाजीनगरमध्ये शाळेत घुसलेल्या रेड्याने 13 विद्यार्थ्यांना जखमी केले, घाटी रुग्णालयात उपचार सुरू. शाळेच्या मधल्या सुट्टीत ही धक्कादायक घटना घडली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर शहरात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. जुबली पार्क भडकल गेट परिसरातील नवखंडा कॉलेजच्या मॉडर्न स्कूलमध्ये शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर येत असताना एक रेडा शाळेच्या परिसरात घुसला. मोकळा सुटलेला हा रेडा बाहेर दोन तीन जणांना धडक देऊन सरळ शाळेच्या परिसरात घुसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही चांगलीच धांदल उडाली होती. यामुळे शाळेच्या परिसरात धावपळ माजली. या रेड्याच्या धडकेत काही विद्यार्थी जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेच्या गेटवर वॉचमनने रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रेडा सरळ गेटमधून आत शिरला. त्यानंतर शाळेने जखमी विद्यार्थ्यांना घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.