Nashik : बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे. नाशिकच्या बीटी कडलक कन्स्ट्रक्शन, पर्वत कन्स्ट्रक्शन, पावा कन्स्ट्रक्शन सह अनेक बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदारांवर छापे टाकण्यात आले आहे. जवळपास 20 ते 25 ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात आयकर विभागाचे 150 अधिकारी सत्तर वाहनांमध्ये पहाटे नाशिक शहरात दाखल झाले आहे. शासनाच्या विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याच्या संशयावरून अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com