Mumbai Metro 3 : मे अखेरीस भुयारी मेट्रो सेवेत दाखल होणार, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोची ट्रायल सुरू

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर ‘कुलाबा - वांद्रे - सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेच्या चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात केली.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर ‘कुलाबा - वांद्रे - सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेच्या चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात केली. या चाचण्यांना मंगळवारपासून सुरुवात झाली असून विविध प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना मे अखेरीसपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com