Sunil Shukla On MNS : मनसेचे निवडणूक चिन्ह 'रेल्वे इंजिन' रद्द करा, सुनील शुक्ला यांचं निवडणूक आयोगाला पत्र

मनसे निवडणूक चिन्ह: सुनील शुक्ला यांची 'रेल्वे इंजिन' रद्द करण्याची मागणी, निवडणूक आयोगाला पत्र.
Published by :
Prachi Nate

मनसेचे निवडणूक चिन्ह “रेल्वे इंजिन” रद्द करण्याची सुनील शुक्ला यांची भारतीय निवडणूक आयोगाकडे मागणी. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी निवडणूक आयोगाला या मागणीच पत्र लिहलं आहे. या पत्राला शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नोंद रद्द करावी व “रेल्वे इंजिन” चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करावं ही मागणी करण्यात आली आहे.

सुनिल शुक्ला म्हणाले की, "राज ठाकरे सरकारमध्ये तीन इंजिनची सरकार आहे. ते एकमेकांसोबत वाद घालतात. तुमच्याकडे देखील 2009 पासून रेल्वे इंजिन आहे. त्याचा कधी वापर झालेला नाही. तो फक्त हिंदूंना मारायचं त्यांना रडवायचं यासाठी तुम्ही त्या इंजिनचं वापर केलेलं आहे. सध्या त्या इंजिंनला गंज लागलेला असून ते असचं पडलेलं आहे. जर तुमच्या लोकांनी असचं फोन केला तर केवळ तुमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन रद्द व्हव असं नाही, तर तुमच्या ज्या प्रादेशिक मान्यता देखील रद्द होईल. तुमच्या रेल्वे इंजिनचं चिन्ह देखील रद्द करायला रावणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदुत्वाच्या विरोधात जे जाणार मी त्यांच्या विरोधात जाणार आहे", असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे.

सुनिल शुक्ला यांच पत्र

श्री राजसाहेब ठाकरे, आपण आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांना पंडित सुनील शुक्ला यांना धमकी देण्याचे आदेश देत आहात. मी केवळ आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी नव्हे, तर आपले राजकीय चिन्ह – रेल्वे इंजिन – रद्द करून आपल्या पक्षाला महाराष्ट्रात ‘अवर्जून नोंदणीकृत’ पक्ष घोषित करावे, यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे.

तुम्हाला काही सांगायचे असेल, तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या फोन करू शकता. मला तुमच्याशी बोलायला आनंद होईल. पण तुमच्या कार्यकर्त्यांमार्फत किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न करू नका. माझा मोबाईल क्रमांक माझ्याकडे आहेच, आणि तुम्ही तो राष्ट्रीय वा प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमार्फत सहज मिळवू शकता. तुमचा फोन येण्याची मी वाट पाहतो.

पंडित सुनिल शुक्ला

राष्ट्रीय अध्यक्ष

उत्तर भारतीय विकास सेना

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com