Car Parking Accident Video : चुकून रिव्हर्स गिअर पडला, कार थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली

पुण्यातील शुभ अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, दुसऱ्या मजल्यावरून कार खाली कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही.
Published by :
Team Lokshahi

पुण्यात दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून कारपुढे घेण्याऐवजी मागे घेतल्याने अपघात झाला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंटमध्ये पार्किंगमधील गाडी पुढे घेण्या ऐवजी मागे घेतल्याने हा अपघात झाला आहे.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान ही घटना घडताच आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी चालकाला त्वरित कारमधून बाहेर काढले. नागरिकांनी लगेच मदतीसाठी धाव घेतल्यामुळे मोठा अपघात होण्यापासून टळला. या अपघात सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com