व्हिडिओ
Nashik | नाशिकमध्ये चाललंय काय? सलग दुसऱ्या दिवशी शहरात गाड्यांची तोडफोड
नाशिकरोड भागात आजही मध्यरात्री गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या
नाशिक: नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. नाशिकरोड भागात आजही मध्यरात्री गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून चार ते पाच वाहने फोडण्यात आली आहे.
परवा रात्री विहितगाव परिसरात टवाळखोरांकडून रस्त्यावरील चार गाड्यांची कोयत्याने तोडफोड करण्यात आली ही घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नाशिकरोड (Nashik Road) परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
24 तासांत दुसरी तोडफोडीची घटना घडली आहे. त्यामुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.