CBSE 10th Board Exam | दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार; CBSE चं नवीन धोरण

CBSE दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा होणार, २०२६-२७ पासून नवीन धोरण लागू. पहिली परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये, दुसरी मेमध्ये होईल.
Published by :
shweta walge

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. या नवीन मसुद्यामुसार वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. पहिली बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी मेमध्ये होईल. मात्र, आता नवीन धोरणानुसार म्हणजे २०२६ पासून पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही. आता या नवीन धोरणाचा मसुदा सीबीएसईने तयार केला असून या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com