Central Railway, AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, कसं असणार नवं वेळापत्रक?

उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने खूश खबर दिली आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
Published by :
Prachi Nate

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असल्याची माहिती मिळत आहे. मार्च महिन्यामध्येच नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळालं असता. उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने खूश खबर दिली आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येणार असून, बुधवार, 16 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर तूर्तास सहा एसी लोकल आहेत. त्यापैकी पाच लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात. एक लोकल देखभालीसाठी राखीव असते.

प्रशासनाने त्यांच्या ताफ्यात असलेली अंडरस्लंग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतल्याने लोकलची संख्या सात होईल. परिणामी फेऱ्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे बुधवारपासून एसी लोकलच्या फेऱ्या 66 वरून 80 होतील. सीएसएमटी ते बदलापूरदरम्यान या गाड्या चालविल्या जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नवीन एसी लोकलसेवांचे वेळापत्रक

अप मार्गावर

कल्याण - सीएसएमटी 7:34 सकाळी

बदलापूर - सीएसएमटी 10:42 सकाळी

ठाणे - सीएसएमटी 1:28 दुपारी

ठाणे - सीएसएमटी 3:36 दुपारी

ठाणे-सीएसएमटी 5:41 संध्या.

ठाणे-सीएसएमटी 7: 49 संध्या.

बदलापूर-सीएसएमटी 11:04 रात्री

डाऊन मार्गावर

सीएसएमटी - बदलापूर 9:09 सकाळी

सीएसएमटी-ठाणे 12: 24 दुपारी

सीएसएमटी - ठाणे 2:29 दुपारी

सीएसएमटी-ठाणे 4:38 संध्या.

सीएसएमटी - ठाणे 6:45 संध्या

सीएसएमटी - बदलापूर 9:08 रात्री

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com