व्हिडिओ
Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; 12 गावांचा संपर्क तुटला
राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
( Chandrapur Rain ) राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 12 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला असून नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व पोंभुर्णा तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.