Chandrashekhar Bawankule:'देशातील प्रमुख राज्यांच्या धोरणाचा अभ्यास केला जाणार'

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवं वाळू धोरण तयार करण्याची घोषणा केली आहे. देशातील प्रमुख राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून 15 दिवसांत मसुदा तयार होईल.
Published by :
Prachi Nate

राज्यामध्ये नवं वाळू धोरण तयार केले जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. देशाच्या प्रमुख राज्याचा अभ्यास केला जाणार असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. येत्या 15 दिवसांमध्ये नव्या धोरणांचा मसुदा तयार केला जाणार असून वाळू माफियांना चाप लावण्यासाठी आता काही निर्णय घेतले जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दगडखानीतून येणारी वाळू जी क्रश चार्ड आहे ती किती वापरायची तसेच नदीतील वाळू किती वापरायची यातून आपल्याला जे, सरकारचं बांधकाम आहे ते कसे पुर्ण होती... तसेच घरकुलांना गरीब माणसांना रेती कशी मिळेल याकरता एक विस्तृत धोरण आम्ही याठिकाणी लवकरचं 15-20 दिवसांमध्ये आणतो आहे.... असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

तर पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दरम्यान यामध्ये संपुर्ण देशाच्या संपुर्ण राज्याचा सुद्धा वाळू धोरण मागवलेलं आहे.... जनतेच्या देखील काही एक्सपर्ट लोकांच्या ज्या सुचना असतील, त्या देखील आम्ही स्वीकारू आणि या राज्याला चांगल आणि कधीही बदलाव लागणार नाही असं वाळू धोरण आम्ही देणार आहोत... असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com