Sanjay Kenekar : औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदला, भाजप आमदार संजय केनेकर यांची मागणी

खुलताबादचे नाव बदला: भाजप आमदार संजय केनेकर यांची मागणी, औरंगजेबाची कबर असलेल्या ठिकाणाचे नाव रत्नपुर करा.
Published by :
Prachi Nate

औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलून ते रत्नपुर करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली असून ऐतिहासिक दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी या MIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लाटल्या असून यामुळे ओवैसी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com