Nitesh Kumar Bihar: बहुमत चाचणीआधी बिहारच्या राजकारणात गोंधळाचे वातावरण

बिहारमध्ये आज बहुमत चाचणी होणार आहे. नितीशकुमार सरकारचे आज भवितव्य ठरणार आहे. बहुमत चाचणीआधी बिहारच्या राजकारणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळतय आणि राजकीय हालचालींना सुद्धा वेग आल्याचं दिसत आहे.
Published by :
Team Lokshahi

बिहारमध्ये आज बहुमत चाचणी होणार आहे. नितीशकुमार सरकारचे आज भवितव्य ठरणार आहे. बहुमत चाचणीआधी बिहारच्या राजकारणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत असून राजकीय हालचालींना सुद्धा वेग आल्याचं दिसत आहे.

एनडीए सरकारने बिहारमध्ये स्थापन केलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. दरम्यान तेजस्वी यादव यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. रात्री सुद्धा पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले होते. तेजस्वी यादव यांच्या घरी कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com