मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना विश्वासात घेतलं नाही; भुजबळांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात छगन भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात छगन भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही, असे भुजबळांनी म्हंटले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना विश्वासात घेतलं नसल्याचा मोठा आरोपही छगन भुजबळांनी केला. शिंदे समिती विसर्जीत का केली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. मराठा कुणबी नाहीत हे सुप्रीम कोर्टानं सांगतिले असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com