Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; व्यक्त केली खंत
नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीमध्ये पवार, पटेल, तटकरेच निर्णय घेतात- छगन भुजबळ
काही लोकांना शब्द दिल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांकडून खंत व्यक्त केली गेली आहे. राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेच निर्णय घेतात, फडणवीस आणि बावनकुळे मला मंत्रिंडळात घेण्याकरता आग्रहीत होते, असं देखील भुजबळांच म्हणणं आहे.याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री कोणाला करायच हे आम्हाला माहित नाही- छगन भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले की, चर्चा असायला पहिजे... भाजपचे सुद्धा रेड पार्टीपर्यंत चर्चा होते. पवार साहेबांना पण काय करायचं असेल तर तिथे कोणाला काय माहितचं नाही.... शेवटच्या खेळामध्ये फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे तिघेच निर्णय घेतात.
म्हणजे चर्चेमध्ये किंवा डिसिजन मेकिंग जो असतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य.... कोणाला तिकीट देणार हे आम्हाला काय माहितच नाही, तिकीट कोणाला द्याच याची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायच हे आम्हाला माहित नाही, त्या तिघांना सगळ माहित आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.