मराठा आरक्षणाबाबत भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, आरक्षण मर्यादा...

मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विचारलं असता छगन भुजबळांनी बोलणं टाळलं आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यातील आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असे विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच, आवश्यकता असल्यास जातनिहाय जनगणना करावी, असा सल्ला देखील भुजबळांनी दिली आहे. तर, मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विचारलं असता जरांगे खूप काही बोलत असतात. त्यांना उत्तर देणं गरजेचं नाही, असे म्हणत छगन भुजबळांनी बोलणं टाळलं आहे. मात्र, त्यांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com