Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिसळीवर मारला ताव... स्वतः भरलं बिल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमन मॅन इमेज साठी जाणले जातात. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळीनिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमन मॅन इमेज साठी जाणले जातात. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळीनिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ पासूनच मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाना भेटी देत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान ठाण्यातील प्रसिद्ध आशा मामलेदार मिसळीचा अस्वादही त्यांनी यावेळी घेतला. त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक, रविंद फाटक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा होते..मिसळीचा आस्वाद घेतल्या नंतर त्याच बिल मुख्यमंत्री यांनी स्वतः दिल आणि आपण कसे कॉमन मॅनच आहोत हे दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या वागणूकीमुळे उपस्थित शिवसेना कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांचा जयजयकार केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com