CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा,हेमंत गोडसेंसाठी शिंदे मैदानात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये आज तातडीचा दौरा असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये आज तातडीचा दौरा असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत सुद्धा नाशिकला जाणार. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले. आज सायंकाळी व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांसोबत संवाद करणार.

नाशिकच्या मनोहर गार्डन येथे शिक्षण संस्था चालक क्रीडा आणि अन्य प्रतिनिधींसोबत संवाद साधणार. तर नाशिकमधील उद्योजकांसोबत देखील बैठक घेणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरल्याचं दिसतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com