CM Eknath Shinde ; समृद्धी महामार्गावरील अपघातांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi

समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे की, शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.

आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याचीही सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक या ठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com