CM Devendra fadnavis: दादरच्या हनुमान मंदिरावर मुख्यमंत्र्यांनी काय मांडली भूमिका?
पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. याच सांस्कृतिक राजधानी एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम वाचन संस्कृतीला चालना देण्याकरीता करत आहे. मागील वर्षी देखील मी या कार्यक्रमाला आलो होतो आणि यादरम्यान पुणेकरांनी या पुस्तकाच्या प्रदर्शनाला जो प्रतिसाद दिला होता तो खरोखरंच थक्क करणारा होता आणि म्हणूनच निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की, इथे यायला पहिजे. मला असं वाटत की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरुवात होत आहेत ते माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे.
रिंग रोडसारख्या ड्रीम प्रोजेक्टवर पुण्याचा अजेंडा काय असणार? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या अडीच वर्षात सेट केलेला आहे. आता त्या अजेंड्याला गती देण हे महत्त्वाचं आहे ती गती आम्ही देऊ.
दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा होता ज्याला आता रेल्वेने देखील स्थगिती दिली आहे. मात्र कायमस्वरुपी रद्द करावी अशा प्रकारच्या मागण्या केल्या जात आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगिरी केलेल्या आहेत. त्यामुळे जूनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगिरी प्रमाणे नियमीत करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्याप्रमाणे त्याच नियमितीकरण करून घेऊ. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
