CM Fadnavis On Rahul Narwekar: अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हत....- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. कालपर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली तर आज उर्वरित 8 आमदार शपथ घेणार आहेत. राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, मी विरोधीपक्षाचे देखील आभार मानतो, या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवड करण्याची एक परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पुर्ण समर्थन दिल्याबद्दल विरोधापक्षातील सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो.
अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हत....-देवेंद्र फडणवीस
पुढे मिश्किल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हत.... पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. तसंच मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे की, राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता... आता तुम्ही झाल्यामुळे 50-50 टक्के मेजोरिटी झाली आहे. पण मला असं वाटत की एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच शंका नाही.
नाना मागच्यावेळी तुम्ही वाट मोकळी केली त्यामुळे.....-देवेंद्र फडणवीस
1977 ला मुंबईमध्ये जन्माला आलेले राहुल नार्वेकर हे पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्यां टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि पुन्हा लागोलाग ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंचे आभार मानत पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाना भाऊ... तुमचे देखील मनापासून आभार आहेत तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा ही ते लहान आहेत. पण नाना मागच्यावेळी तुम्ही वाट मोकळी केली त्यामुळे ते अध्यक्ष बनू शकले. त्यांना त्याआधी विधानपरिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यांना कायद्याची जास्त आहे आणि त्यामुळे अध्यक्ष हा कायद्याची जाण असलेला असणं हे फार महत्त्वाचं आहे.