सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

मुंबईकरांना वाढत्या महागाईचाही फटका बसणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईकरांना वाढत्या महागाईचाही फटका बसणार आहे. मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडनं घेतला आहे.

सीएनजी दीड रुपयाने तर पीएनजी एक रुपयाने महागले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची महागाईने चिंता वाढवली आहे. मुंबईमध्ये आता एक किलो सीएनजीचे दर 75 रुपयांवर गेले आहेत.

यासोबतच पीएनजीसाठी आता 48 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com