व्हिडिओ
Mumbai Coastal Road News : कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा वाहतुकीस बंद
कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सोमवारपर्यंत कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा बंद करण्यात आलेला आहे.
कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सोमवारपर्यंत कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा बंद करण्यात आलेला आहे. तपासणीच्या कामासाठी दक्षिण बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोगद्यातील वाहतूक एन.एस. पाटकर मार्गाने वळवण्यात आली आहे.
कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत सदर मार्गावरील उजव्या बाजूकडील बोगद्यामध्ये (दक्षिण वाहिनी) 2 डीजी सेट्स तपासणीचे काम करण्यात येणार असल्याने उजव्या बाजूकडील बोगदा (दक्षिण वाहिनी) वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. 2 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद असणार आहे. या मार्गावरील दक्षिण वाहिनीवरून येणारी वाहतूक अमरसन येथून उजवे वळण घेऊन मुकेश चौक येथून डावे वळण घेऊन एन. एस. पाटकर मार्गाने इच्छित स्थळी मार्गस्थ होईल.