व्हिडिओ
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. मरीन ड्राईव्ह ते वरळी बांद्रा सिलिंक पर्यंत जोडणारा हा कोस्टल रोड सध्या 84% काम पूर्ण झाले आहे.
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. मरीन ड्राईव्ह ते वरळी बांद्रा सिलिंक पर्यंत जोडणारा हा कोस्टल रोड सध्या 84% काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे साधारण मे महिन्यात या कोस्टल रोडचे लोकार्पण होईल मात्र येत्या काही दिवसातच याची एक लेन ही मुंबईकरांसाठी खुली केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कोस्टल रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी साधारण पाच हजार कामगार हे अहोरात्र काम करत आहेत. साधारण 10.58 किलोमीटर लांबीच्या या कोस्टल रोडची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत.