Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात तक्रार दाखल,राजू पाटलांवर गुन्हा दाखल असल्याचा दावा केल्याने कारवाई

Washim Politics: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते राजू पाटील राजेंविरोधात खोटा गुन्हा असल्याचा दावा केल्याने वाशिममध्ये तक्रार दाखल झाली आहे
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध वाशिम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. सहा दिवस आधी नागपूर येथे पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्याविरुद्ध नकली नोटांच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात राजू पाटील राजे यांच्याविरुद्ध असा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे उघड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांतून संतापाची लाट उसळली.

भाजपकडून विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, खोटी माहिती पसरवल्याबद्दल १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येईल, अशी घोषणा राजू पाटील राजे यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे राजे यांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचे सांगत भाजपने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. हा वाद वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवत आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com