व्हिडिओ
News Planet With Vishal Patil | MVA | आगामी निवडणुका मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र?
तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी लागणाऱ्या २९ जागाही निवडून आणता न आल्याने पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र हा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीत ९५ पैकी केवळ २० उमेदवार निवडून आल्याने नाऊमेद झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. ‘मातोश्री’वर विजयी आमदारांच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम न केल्याचा सूर आळवला गेला. तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी लागणाऱ्या २९ जागाही निवडून आणता न आल्याने पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांचा ठाकरे गटाला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात आला.