Mumbai Ac local train news ac local doors did not opened
Mumbai Ac local train news ac local doors did not opened

Viral Video : नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने गोंधळ

काल रात्री नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने नालासोपारा चे प्रवासी थेट विरारला पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

वसई विरार : संदीप गायकवाड | काल रात्री नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने नालासोपारा चे प्रवासी थेट विरारला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. तेथे प्रवाशांनी अर्धा तास गोंधळ घातला होता.

काल सोमवार रात्री 11.16 ला नालासोपारा रेल्वे स्थानकात चर्चगेट हून येणारी एसी लोकलचे दरवाजे तांत्रिक कारणामुळे उघडले गेले नाहीत. फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले. आणि बाकीचे नऊ दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवासी थेट विरार रेल्वे स्थानकात पोहचल्याने नालासोपारा प्रवाशांनी एसी लोकल च्या ड्रायव्हरच्या केबिन समोर अर्धा तास गोंधळ घातला.शेवटी 12.15 ची शेवटची विरार चर्चगेट लोकल ने प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकात पोहचले. या गोंधळामुळे शेवटची लोकल ही उशिराने सुटली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com