Kolhapur News : कोल्हापूरात बारावीच्या परीक्षेचे विषय ऐनवेळी बदलल्यानं गोयंका कॉलेजमध्ये प्रचंड गोंधळ
दहावी- बारावी या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असतात. या परीक्ष्यांची चिंता मुलांप्रमाणे पालकांना देखील असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा तोडांवर आल्या असतानाच, कोल्हापूरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या विमला गोयंका इंग्लिश मीडियम कॉलेजमध्ये एक गोंधळ पाहायला मिळाला आहे.
विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रचंड गोंधळ झाला. याला कारण म्हणजे बारावीच्या परीक्षेचे विषय ऐनवेळी बदल्याने, पालक विद्यार्थ्यांमध्ये हा सगळा संभ्रम निर्माण झाला. कॉम्प्युटर सायन्यऐवजी भूगोल हा विषय दिल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तसेच प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचे फोटो, विषयाचे कोड स्कॅन होत नसल्याने आक्रमक झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी हायस्कूलच्या प्राचार्यांना जाब विचारला.या सगळ्या प्रकरणानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.