Anjali Damania: अंजली दमानिया यांच्याकडून करुणा मुंडे यांचे अभिनंदन; घरगुती हिंसाचारप्रकरणी धनंजय मुंडे दोषी
बीड जिल्ह्यातील आघाडीचे नेते धनंजय मुंडे हे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. घरगुती हिंसाचारप्रकरणी धनंजय मुंडे दोषी ठरले आहेत. धनंजय मुंडेंच्या याचं प्रकरणात दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानियांकडून करुणा शर्मा यांचं अभिनंदन केलं आहे.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
"करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत".